जनतेज न्युज

भाऊबीज निमित्त मिठाई व साखरेचे नारळाला मागणी मात्र सूर्यग्रहणामुळे बाजारात रोनक कमी

प्रतिनिधी, जळगाव : भाऊबीजेला साखरेच्या नारळ व मिठाई तसेच करदोळे यांची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असते त्यासाठी बाजारात हे पदार्थ व वस्तू विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आलेले आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळ असल्याने दिवाळी एवढ्या उत्साहात साजरी झाली नाही परंतु यावर्षी दिवाळी खूप मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले बाजारात नागरिकांनी खरेदीसाठी चांगला प्रतिसाद दिला व मोठ्या प्रमाणावर खरेदी देखील केली भाऊबीज साठी मिठाई व साखरेपासून बनवलेल्या नारळ आणि करदोळे मोठ्या प्रमाणावर मागणी असते कालपर्यंत बाजारात चांगल्या प्रमाणे ग्राहकाने खरेदी केली परंतु आज सूर्यग्रहण असल्याकारणाने नागरिकांनी बाजारात येणं टाळलं त्यामुळे बाजारात रोनक नसल्याचे दिसत होतं त्याचा मिठाई व साखरेच्या नारळ विक्रीवर परिणाम झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले.