प्रतिनिधी, बीड : भारतीय चलनी नोटांवर सध्या अनेक देव-देवता आणि महापुरुषांचे फोटो छापण्यावरून राजकारण सुरू आहे. आता यात यशवंत सेना देखील पडली आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे कार्य पाहता त्यांचे फोटो चलनी नोटांवर छापण्यात यावा अशी मागणी यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब दोडताले यांनी केली आहे. अहिल्याबाई होळकर ह्या पहिल्या संत महिला आहेत. त्यांचे देशाच्या विकासासाठी योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारने अहिल्याबाई यांचा फोटो चलनी नोटांवर छापण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे.
