प्रतिनिधी, मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुडयांप्रमाणे मेथी, पालक शेपूच्या दरात १८०० रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात ४००० ते ८५०० रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे. कोथिंबीरचे भाव गगनाला भिडलेले पाहायला मिळाले. सद्यस्थितीत १०० जुड्यांप्रमाणे कोंथिबीर १२ हजार रुपये दराने विकली जात आहे. मिरचीच्या दरात ८०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. पावटा व वांग्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. कोबीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. फ्लॉवरच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. एकंदरीतच सर्वच भाज्यांच्या किंमती वाढलेल्या पाहायला मिळत आहेत. अवकाळी पावसाचा फटका विशेषतः पालेभाज्यांना बसल्याने भाज्यांच्या किंमती वाढल्याचे कारण व्यापारी सांगत आहेत.
