प्रतिनिधी , मुंबई : रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आज २.६ अब्ज डॉलर्सची संपत्ती गमावली आणि ब्लूमबर्ग अब्ज अब्जाधीश निर्देशांकातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीतून ४ स्थानावरून दहाव्या क्रमांकावर आले आहेत.
आज रिलायन्सचे शेअर्स बुधवारी ७.७ टक्क्यांनी घसरले आणि अंबानीने सांगितले की कंपनीच्या तेल ते केमिकल व्यवसायातील २० टक्के हिस्सा अरमकोला विकण्याची कंपनीची योजना लांबणीवर पडली आहे. आज आरआयएलच्या गुंतवणूकदारांना सुमारे १.२६ लाख कोटी रुपयांचा तोटा झाला.
