जनतेज न्युज

फर्स्ट न्यू इअर सेलिब्रेशनवर पोलिसांची करडी नजर

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कोरोना काळानंतर या वर्षी सर्वच सण उत्साहात आणि निर्बधमुक्त साजरे केले गेले. आता नवीन वर्ष सुद्धा तितक्याच दणक्यात सेलिब्रेट केलं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांनी देखील आपली तयारी सुरू केली. हॉटेल, रिसॉर्ट, फार्महाऊस , मोठे हॉल याठिकाणी सुद्धा पार्ट्यांचं आयोजन केलं जात , महिला तरुणीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित असतात, अनेकदा हे सर्व सुरू असताना अनुचित प्रकार घडत असतात किंवा घडू शकता, या साठी कल्याण झोन 3 पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचा-यांची दोन पथक स्थापन केले असून ही पथकं 31 डिसेंबरच्या रात्री विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेवर भर देणार आहे. गर्दीच्या ठिकाणी ही पथकं गस्त घालणार आहेत. त्याचप्रमाणे कोणीही अडचणीत आल्यास त्याच्या परियन्त मदत पोहचण्यासाठी कल्याण झोन 3 पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांही 112 नंबर वर फोन करण्याचे आव्हान करत रिक्षा व शहरातील अनेक ठिकाणी जवळपास 10 हजार पत्रक लावली आहे. या क्रमांकावर फोन करताच अवघ्या 5 ते 7 मिनिटात स्टेशन किंवा इतर पोलीस यंत्रणा यांच्यापर्यँत पोहचत मदत दिली जाईल .