जनतेज न्युज

शिवसेना पक्ष म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना अस आम्ही समजतो – शितल म्हात्रे

प्रतिनिधी , मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून मुंबई महानगरपालिकेतील काही कामासंदर्भात खासदार राहुल शिरोळे आणि महापालिकेचे माजी नगरसेवक यांनी आज महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांची भेट घेण्यासाठी गेले असता भेट झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात आम्ही बसलो असता काही माजी नगरसेवकांनी येऊन आरडा ओरडा करत गोंधळ केला. तर बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये हे सर्वांना दिसेलच भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा भगवा महापालिकेवर फडकणार असे वक्तव्य शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी केले आहे.