प्रतिनिधी , नागपूर : अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विसंवाद महाविकास आघाडीच्या पक्षांन मध्ये दिसत आहे आणि त्याचेच प्रत्यंतर आज शेवटच्या दिवशी पण दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये एकता दिसत नाही. अजित पवार ह्यांना गृहीत धरले जात आहे. तर एवढ्या मोठ्या नेत्याला गृहीत धरण योग्य नाही. त्यांच्याशी जो काही टीका, विश्वास आघात करायचा आहे सरकार ला तो शक्तिहीन असेल असं माझं मत आहे. आणि ह्या निमित्ताने पुन्हा महाराष्ट्राच्या जनतेसमोर असे दिसते की महाविकास आघाडी एकत्रित राहू शकत नाही, लढू शकत नाही.
