जनतेज न्युज

समाजातील प्रत्येक घटकाने फसव्या जहिरातीपासून सावध राहिलेच पहिजे – वाय बी चंदनशिवे

प्रतिनिधी , कोल्हापूर : शासनाने दिलेला ग्राहक संरक्षण कायदा सर्वांनी वापरावा, असे आवाहन जिल्हा ग्राहक कल्याण संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वाय बी चंदनशिवे यांनी केले. ते भुदगरड तालुका ग्राहक कल्याण फौंडेशनच्या वतीने आयेजित केलेल्या कृषी विषयक कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. आज दुपारी १२ वा. कृषितंत्र निकेतन गारगोटी महाविद्यालयात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या पी. पी. देसाई या होत्या.
उपाध्यक्ष चंददनशिवे पुढे म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकाने फसव्या जहिरातीपासून सावध राहिलेच पहिजे. शासनाने दिलेला ग्राहक संरक्षण कायदा देऊनही तो आपण वापरत नाही. सध्याच्या जगात ऑनलाईन पध्दतीतीतही आपली फसवणूक होते. देशात कोठेही वस्तू खरेदी केल्यास व त्या पोटी फसगत झाल्यास आपण न्यायालयात दाग मागू शकतो. यावेळी त्यांनी सहा मुलभूत हक्कांची जाणीव करून दिली.