जनतेज न्युज

अंगणवाडी सेविकांचा प्रश्न 12 जानेवारी रोजी बैठक घेऊन मार्गी लावणार; मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

प्रतिनिधी, मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील अंगणवाडी सेविकांचे मुंबईतील आझाद मैदान येथे दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांचे निवेदन अंगणवाडी सेविकेच्या शिष्ट मंडळानी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून  दिले. अंगणवाडी सेविकेच्या शिष्ट मंडळाच्या आज झालेल्या मुख्यमंत्रांच्या बैठकीत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंगणवाडी सेविकांचा प्रश्न 12 जानेवारी रोजी बैठक घेऊन मार्गी लावेल असं आश्वासन दिल्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या संघटनेचे अध्यक्ष एम एम पाटील यांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला