प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद पोलीस अधीक्षक आवाहन करण्यांत येते की, नायलॉन सिंथेटीक धाग्यापासून बनविलेल्या मांजामुळे मानवी व प्राणी जिवीतास मोठया प्रमाणात धोका निर्माण होत असल्याने अशा प्रकारे मानवी व प्राणी जिवीतास अपायकारक असलेला नायलॉन प्लास्टीक सिंथेटीक धाग्यापासून बनविलेला मांजा खरेदी विक्री करणारे साठा करणारे दुकानदार त्यांची निर्मीती अथवा पुरवठा करणारे इसमांवर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद ग्रामीण जिल्हयातील सर्व २३ पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यांत आली असुन अशा ईसमांबाबत काही माहिती असल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षास ११२ या क्रमांकावर तसेच खालील नमुद पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना त्यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्क साधुन माहिती देण्यांत यावी, माहिती देणाऱ्या व्यक्तींचे नांव गोपनीय ठेवण्यांत येईल.तसेच सक्रांत सणानिमित्त सर्व पतंग विक्री करणारे दुकानदार व पुरवठादार यांना अवाहन करण्यांत येते की, कोणीही पर्यावरणास अपायकारक असलेल्या नायलॉन मांजाची विक्री, पुरवठा, वाहतूक करू नये असे आढळून आल्यास संबंधीत दुकानदार व पुरवठादार यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यांत येईल इशारा देण्यात आला.
