प्रतिनिधी, जळगाव : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरण कंपनीतील कर्मचारी अधिकारी वर्ग तर्फे खाजगीकरणाच्या विरोधात अदानी वीज कंपनीला विज वितरण करण्यासाठी परवानगी देऊ नये या विरोधात तीन दिवसाचा संप पुकारलेला असून 3 जानेवारी मध्यरात्रीपासून पुढील तीन दिवस हा संप सुरू असणार असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाला तसेच छोट्या मोठ्या व्यवसायिकांना याचा फटका बसला आहे .याकडे राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित योग्य निर्णय घेऊन संप मागे घ्यावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे. यावेळी पाचोरा तालुक्यातील महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या गेटवर आंदोलन करत अदानी गो बॅकच्या घोषणा दिल्या तर महावितरण कार्यालयातील कर्मचारी मोठ्याप्रमाणात या संपात सहभागी झाले असल्याने पाचोरा तालुक्यातील विद्युत पुरवठा खोळंबली आहे. महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्याच्या संपामुळे पाचोरा तालुक्यातील बहुताश भागात सकाळपासून विजपुरवठा खंडित ,विजेमुळे पाणी पुरवठा योजना बंद असल्याने नागरिकाचे हाल होत आहेत. सध्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बीच्या लागवड केली असुन पिकाला पाणी मिळाले नाही तर पिक धोक्यात येण्याची भीती शेतकरी मध्ये आहे,विजेवर अवलंबून असलेले व्यवसाय बंद असणार असल्यमुळे लाखो उलाढाल ठप्प होणार आहे.यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.यावेळी पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी यावेळी संपाच्या ठिकाणी भेट दिली आणि संपाला पाठिंबा दिला आहे.
