जनतेज न्युज

जर नार्को टेस्ट मुळे सत्य बाहेर येत असेल तर देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे – खा. अनिल बोंडे

प्रतिनिधी , अमरावती : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरुड मोर्शीचे उमेदवार तथा आमदार देवेंद्र भुयार यांच्या वाहनावर बंदुकीच्या गोळ्या झाडल्या व त्यांच्या वाहनाची जाळपोळ केली असा आरोप झाला होता, तर या प्रकरणाला आता तीन वर्षानंतर नवे वळण आले आहे, आमदार देवेंद्र भुयार यांची नार्को टेस्ट करा या मागणीसाठी वरुड सर्वपक्षीय आमरण उपोषण सुरू झाले. यावर भाजप नेते व खासदार अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया देत खळबळ उडवुन दिली, देवेंद्र भुयार यांनी लोकांच्या भावना भडकवण्यासाठी स्वतःच हे कृत्य केले होते माझ्यावर सुद्धा आरोप झाले होते देवेंद्र भुयार यांनी मतदारसंघातील लोकांना फसवलं जर नार्को टेस्ट मुळे सत्य बाहेर येत असेल तर देवेंद्र भोयर यांची नार्को टेस्ट केली पाहिजे अशी मागणी खासदार अनिल बोंडे यांनी केली