जनतेज न्युज

विश्व मराठी साहित्य संमेलना द्वारे नव उद्योजकांना आपल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्याची संधी

प्रतिनिधी , मुंबई : राज्य मराठी भाषा विभागातर्फे मुंबईत विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या 2 दिवसांपासून हे संमेलन उत्साहात पार पडत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज लोक इथे हजेरी लावत आहेत आणि उस्फूर्तपणे या संमेलनात मार्गदर्शन करत आहेत. मराठी भाषा, संस्कृती, साहित्य आणि परंपरेचे तसेच उद्योगाचे दर्शन या संपूर्ण संमेलनात घडत आहे. यानिमित्ताने मराठी भाषेचा वेध घेणाऱ्या या संमेलनाला लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

याचाच एक व्यवहारिक भाग म्हणून या संमेलनाच्या निमित्ताने अनेक नव उद्योजकांना आपल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्याची संधी मिळत आहे. याचा नक्कीच त्यांना भविष्यात आर्थिक लाभ होईल, असा विश्वास सर्व उद्योजक वर्तवत आहेत.