प्रतिनिधी , मुंबई : गुजरातच्या पाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आता महाराष्ट्रातील उद्योग, बॉलिवूड पळवण्यासाठी मुंबईमध्ये डेरा डालून बसलेले आहेत आणि वास्तविक त्यांनी बैठका घेतल्या त्या बैठकीतनं उत्तर प्रदेशच व्हिजन सांगितलं परंतु या सर्व सर्व गोष्टी उत्तर प्रदेश मधून जास्त खासदार निवडून आणायच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे.
गुजरातच्या निवडणुका होत्या महाराष्ट्रातले उद्योग पळवले गुजरातमध्ये सरकार आणलं. 2024 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक खासदार भारतीय जनता पार्टीला त्या राज्यातुन मिळतात म्हणून लोकसभेची पूर्वतयारी म्हणून महाराष्ट्रातील काही उद्योग आता उत्तर प्रदेश मध्ये पाठवण्याचा डाव भारतीय जनता पार्टी रचत आहे. या डावाला हरून पाडण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे, महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांच्या नोकरीच आणि गुंतवणुकीच संरक्षण एकनाथ शिंदे यांनी केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या डावाला एकनाथ शिंदे बळी पडता कामा नये अश्या पद्धतीने त्यांनी त्यांची भूमिका घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे
