जनतेज न्युज

ज्ञानगंगा अभयारण्यात पर्यटकांना झाले बिबट्याचे दर्शन

प्रतिनिधी , बुलडाणा : अजिंठा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेल्या बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये विविध प्राणी आणि पक्षांसाठी पोषक वातावरण असल्याने या अभयारण्यात मोठ्या प्रमाणात विविध जाती प्रजातीचे पक्षी, प्राणी वास्तव्यास आहेत. जंगल सफारी दरम्यान अनेक पर्यटकांना प्राणी, पक्षांचे दर्शन होत असते. दरम्यान नांदुरा येथील पर्यटक सदाशिव क्षीरसागर आणि हरिभाऊ बावस्कर हे आपल्या कुटुंबासह ज्ञानगंगा अभयारण्यात जंगल सफारी करत असताना रस्त्यावरून मोठ्या ऐटीत चालताना बिबटा दिसुन आला. त्यांनी या बिबट्याला आपल्या कॅमेरात कैद केले आहे. जंगल सफारी दरम्यान अनेक प्राण्यांचे दर्शन होत असल्याने ज्ञानगंगा अभयारण्यात जंगल सफारीसाठी आता पर्यटकांचा मोठा कौल पाहायला मिळत आहे.