प्रतिनिधी, अहमदनगर : अकोले तालुक्यामधील पठार भागातील अती दुर्गम आदिवासी भागात ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्राअंतर्गत १७ गावे आणि १४ ग्रामपंचायती आहेत. या गावांना आरोग्य सुविधा देण्यासाठी ७ उपकेंद्र आहेत. यात २ वैद्यकिय आधीकारी ७ सिएचओ ३५ कर्मचारी,आणि आरोग्य सेविकांनी नागरिकांना स्वच्छता व संसर्ग नियंत्रण तसेच आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा देत यात सातत्य ठेवून २०२१ – २२ कालखंडात केलेल्या उत्तम कामगिरीतून अहमदनगर जिल्ह्यात कायाकल्प पुरस्काराचे प्रथम क्रमांकांचे मानकरी ठरले आहेत. देशात महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानाची सुरवात झाली. नागरिकांना सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता व संसर्ग नियंत्रण तसेच आरोग्यदायी वातावरणात आरोग्य सुविधा मिळाव्यात. तसेच या संस्थांमधील आरोग्य आधीकारी आणि कर्मचारी यांनी यामध्ये सातत्य ठेवावे. त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाकडून कायाकल्प पुरस्कार योजना राबविली जाते. शासनाकडून निर्धारित केलेली मानक पूर्ण करून ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राने स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रित करत यामध्ये सातत्य ठेवून ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्राने नागरीकांना स्वच्छ आरोग्यदायी वातावरनात उत्तम प्रतीच्या सुविधा दिल्या आहेत. येथील आरोग्य आधीकारी तसेच कर्मचारी ,आशा सेविका यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा कायाकल्प पुरस्कार पटकावला आहे. या पुरस्काराने ब्राम्हणवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राने आपल्या उत्तम प्रतीच्या सेवेचा आदर्श राज्यात निर्माण केल्याने सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
