प्रतिनिधी, मुंबई : मुश्रीफ कुटुंबाच्या ब्रिस्क फॅसिलिटीज (शुगर डिव्हिजन) प्रायव्हेट लिमिटेडचे ₹156 कोटी थकित कर्ज डीफॉल्ट NPA,हसन मुश्रीफ यांनी स्वत: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष म्हणून समायोजित पुनर्रचना केली आहे. याला कोणतीही योग्य परवानगी नसून मागच्या तारखेची नोंद देखील नाही आहे. हसन मुश्रीफ यांनी बँक प्रशासनाच्या संगनमताने बँकेची लूट केली आहे अस भाजप नेते किरीट सोमैया यांनी म्हंटले. जवाब तो देना ही पडेगा असा टोला किरीट सोमैया यांनी हसन मुश्रीफ यांना लगावला आहे.
