जनतेज न्युज

बासलापूर येथील मत्स्यबीज केंद्रावरील पक्के अतिक्रमण जमीनदोस्त प्रशासनाची मोठी कारवाई

प्रतिनिधी, अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील बासलापुर येथील  शासकीय मत्स्यबीज संवर्धन केंद्राचा ठेका संस्था सावित्रीबाई फुले महिला सहकारी मत्स्यव्यवसाय संस्था मर्यादित वाघोली, ता. जि. अमरावती यांना दिला होता. मात्र ठेकेदार संस्थेने येथील जमीनीवर अनधिकृत ताबा केल्याने त्यांचा ठेका रद्द प्रशासनाकडून करण्यात आला होता. सदर जागेवरील ठेकेदार संस्थेचा अनधिकृत ताबा निष्कासीत करून मत्स्यव्यवसाय विभागास ताबा देण्याबाबतची कार्यवाही शुक्रवारी करण्यात आली. पक्के बांधण्यात आलेले अतिक्रमण पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आले.