प्रतिनिधी, नागपुर : महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून शिंदे भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. त्यातच स्वत:ला जेपी नड्डा यांचे पीए म्हणवून घेणाऱ्या नीरजसिंह राठोड यांनी महाराष्ट्रातील अनेक आमदारांना फोन करून मंत्री करण्याची चर्चा केली.नागपूरचे भाजप आमदार विकास कुंभारे या प्रकाराचा फोनही आला होता, त्यामुळे कुंभारे यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क साधून फोनवर घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.कुंभारे यांच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.नागपूर पोलिसांनी नीरज ला गुजरातमधून अटक केली. यासोबतच त्याने आतापर्यंत किती आमदारांना फोन करून पैसे मागितले याचीही माहिती पोलिस घेत आहेत.
