जनतेज न्युज

संजय राऊत यांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये येऊन मैदान लढवावे – आनंद जाधव

प्रतिनिधी, नांदेड : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी नांदेड येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. या मेळाव्यामध्ये त्यांनी हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील व नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वर अशी टीका केली होती की, या दोन्ही गद्दारांना आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये संपल्याशिवाय शांत बसणार नाही. यावर आज शिवसेना उपनेते आनंद जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे की, संजय राऊतांनी मागच्या दाराने येऊन मतदान घेऊन खासदारकी मिळवली आहे. संजय राऊत यांना असे माझे आव्हान आहे की, त्यांनी सर्व सामान्य नागरिकांमध्ये येऊन मैदान लढवावे.