जनतेज न्युज

खामगाव पोलिसांनी बावीस वर्षीय विद्यार्थ्याकडून जप्त केले एक देशी कट्टा आणि पाच जिवंत काडतूस

प्रतिनिधी, बुलडाणा : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील वस्तीगृहात असणाऱ्या एका विद्यार्थ्याकडे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस असल्याची गोपनीय माहिती खामगाव शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाडी परिसरातील मुलांचे वस्तीगृह येथील खोली क्रमांक 205 मधील नितीन राजू भगत वय 22 रा आंबेटकळी याच्या साहित्याची तपासणी केली असता त्याच्या बॅगमध्ये एक देशी आणि पाच जिवंत काढतूस आढळले आहे चौकशी दरम्यान या विद्यार्थ्याने उत्तर दिल्याने त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास खामगाव शहर पोलीस करत आहेत