प्रतिनिधी, जळगाव : गेल्या काही वर्षांपूर्वी पाचशे आणि हजार ची नोट मध्य रात्री बंद केली होती. काळा पैसा बाहेर येईल परंतु या निर्णयातून सर्वसामान्यांना जास्त त्रास सहन करावा लागला होता. बँकेच्या रांगेत उभे राहुन काहींना उन्हाच्या उष्माघाताने जीव गमवावा लागला होता. आणि आता 2000 ची नोट बंदीची घोषणा केली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नोटबंदीतून काय साध्य करायचं हे मला माहीत नाही परंतु त्यांच्या जवळ एक वर्ष अजून सत्ता आहे. या एक वर्षांमध्ये त्यांनी कामगारांचे शेतकऱ्यांचे बेरोजगारांच्या हिताचे निर्णय घ्यावे. कोरोना काळामध्ये बऱ्याचं कंपन्या बंद झाल्या आहेत बेरोजगारी वाढलेली आहे लोकहीताचे निर्णय घ्यावे. अशी प्रतिक्रिया माजी आमदार कैलास पाटील यांनी नोटबंदी वर दिली आहे.
