प्रतिनिधी, अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार निदर्शने केली. आयएल अँड एफएस प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थातच ईडी च्या वतीने तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर ( जिल्हा ) च्या वतीने ईडीच्या वतीने करण्यात आलेल्या या कारवाईला घेऊन तसेच सद्यस्थितीत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडी, सीबीआय, एनआयबी अशा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या दडपशाही कार्यप्रणालीचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
