जनतेज न्युज

बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाने केला सत्कार

प्रतिनिधी, संभाजीनगर :  छत्रपती संभाजी नगर मध्ये आज दुपारी बारावीचा ऑनलाईन निकाल लागला असून यामध्ये बरेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. शहरातील एस .बी महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी 94. 95 टक्के पर्यंत मार्क मिळाले असून त्यांचा आज महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले की आम्हाला आमच्या आई-वडिलांनी अभ्यासामध्ये मदत केली, त्याचबरोबर शिक्षकांनीही भरपूर मदत केली त्यामुळे आज आम्ही टॉप रँक मध्ये येऊ शकलो त्यामुळे आमचा आनंद आज गगनात मावेना अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.