प्रतिनिधी, ठाणे : बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा चालवल्याचा कांगावा काही उबाठा गटातील लोक करत आहेत. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांवर हातोडा चालवलेला आहे, बाळासाहेबांच्या विचारांवर बुलडोझर चालवलेला आहे, आणि अशी काही लोक मातोश्रीवर राहत आहेत. त्यांना पण कधी तरी जाब विचारा, तरच तुम्हाला शिवसैनिक म्हणवून घेण्याचा अधिकार आहे.
