प्रतिनिधी, हिंगोली : आमदार राजू नवघरे व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या वतीने बाराशिव येथे धोंडे जेवणाचा कार्यक्रम व कीर्तनकार मराठवाडा भूषण ह. भ. प अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या धोंडे जेवणाचा व कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी वसमत मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते. या धोंडे जेवणाचा व कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, माजी नगराध्यक्ष अब्दुल ऑफिस अब्दुल रहमान, डॉ. अंकुश देवसकर यांच्यासह सर्वच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजू नवघरे सेवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
