प्रतिनिधी, मुंबई : पनवेल मधील निर्धार मेळाव्यामध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आंदोलनाला हिरवा झेंडा दाखवला असल्याचे सांगितले. तसेच या क्षणापासून केव्हाही आंदोलन करू शकतात फक्त आंदोलनाची कल्पकता प्रत्येकाची वेगळी असते. तसेच खळ्ळखट्याक आंदोलनांची आता अपेक्षा करू नका आता वेगळ्या पद्धतीचे आंदोलनं होऊ शकतात आणि आंदोलनाच्या माध्यमातून निश्चित जाग येणार असल्याचे बाळा नांदगावकर यांनी सांगितले .
