जनतेज न्युज

मनाठा येथील पिंटू उत्तमराव सोनाळे या तरुणाचा तुरुंगातील यशस्वी प्रवास

प्रतिनिधी, नांदेड : बी.एड.उत्तीर्ण झाल्यावर पिंटूवर एक असा प्रसंग ओढावला की, त्याला दहा वर्षे कारावासाची शिक्षा झाली. शिक्षणात हुशार, शेतीत नवनवीन प्रयोग करण्याचे आणि शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले असताना शिक्षेचा निर्णय येतो आणि मन सून्न करणारा प्रसंग ओढावतो. तो स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही, अशा प्रसंगात अनेक इतर मार्ग चोखाळतात पण माझ्यातल्या शिक्षकाने ते होऊ दिले नाही, असा आपला तुरुंगातील प्रवास पिंटू सोनाळे सांगतो. तुरुंगात दाखल झालो ते थंडीचे दिवस अंधारी कोठडी 30 ते 40 कैदी क्षमतेची बरं का. आम्ही तिथे 70 ते 80 जण साधी बसायला जागा नाही तेथे झोपत होतो. पहिली रात्र अक्षरशः कोठडीचे गज किती वेळा तरी मोजून काढले, त्यातूनही सावरलो. जामीनासाठी अर्ज केल्यावर तो देखील न्यायालयाकडून फेटाळला गेला. मी तुरुंनातूनच केस माझी केस लढलो. यामध्ये मला कुटुंबियांची चांगली साथ मिळाली. नाशिक सेंटर जेलमध्ये गेल्यावर मला शिक्षण विभागात काम मिळालं. काम करत असताना अनुभवी कैदी जेलर अधिकारी मनोविश्लेषकांच्या समुपदेशनाचा प्रभाव पडला मग कारागृहाचेच कार्यक्षेत्र झाले. कारागृहातच मी एम.ए.केलं आणि योगा शिक्षक झालो. काही काळ डिप्रेशन मध्ये गेला खरा पण घरच्यांच्या साथ आणि कारागृहातील जेलर आणि इतर मंडळीच्या समउपदेशनामुळे आयुष्याला पुन्हा चांगली दिशा मिळाली. दोन वर्षांपूर्वी कारागृहातून सुटका झाली गावात किराणा दुकान आहे. आता पुन्हा एक चांगली ओळख निर्माण करण्याची नवी आशा निर्माण झालं आहे.