प्रतिनिधी, रत्नागिरी : माजी खासदार निलेश राणे यांच्या राजकारणातून निवृत्ती घेतल्याच्या ट्विटनंतर ते प्रथमच कोकण दौऱ्यावर येत आहेत. आज दुपारी त्यांचे रत्नागिरी शहरात आगमन झाले असता ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून आले. त्यांच्या स्वागतासाठी भला मोठा हार आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे.
