प्रतिनिधी, कोहलपुर : कोल्हापूर सह राज्यात मराठा आरक्षण प्रश्नी आंदोलन सुरू असून या आंदोलनाला विविध पक्षांचे आमदार खासदार येऊन भेट देत आहेत.मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार हरविले असल्याचे मतदारसंघातील नागरिकांचे म्हणणं आहे. खासदार हरवला आहे असा बोर्ड तयार करून पेठवडगाव इथं आज आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले. खासदार हरवला आहे. धैर्यशील माने, वर्ण गोरा, दाढी वाढलेली, मराठा समाजाची मते घेऊन समाजाची फसवणूक केली आहे, कुठे आढळल्यास मतदारसंघात पाठवणी करावी असा फलक घेवून हे अनोख आंदोलन करण्यात आले. इतकच नाही तर लवकरात लवकर परत ये कोणीही रागावणार नाही तुझी खूप आठवण येत आहे अस म्हणत खासदार धैर्यशील माने यांचा चिमटा काढला आहे.
