जनतेज न्युज

विद्यार्थ्याला मारहाण केल्या प्रकरणी शिक्षकाला केले निलंबित

प्रतिनिधी, संभाजीनगर : शहरातील महानगरपालिका शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे मनपा शिक्षण अधिकारी यांनी त्याला निलंबित केले आहे. कांचनवाडी परिसरातील महानगरपालिका शाळेत इयत्ता पहिली मधील शिकणाऱ्या मुलाने शाळेमध्ये कटर आणले असता त्याने दोन-तीन विद्यार्थ्यांना कटरची मारहाण केली व जखमी केले. त्यामुळे शिक्षकांनी त्याच्याकडून कटर घेण्याचा प्रयत्न केला. त्यांने दिले नाही ते कटर विद्यार्थ्यांनी लपवून ठेवले. त्यामुळे ते कटर त्याच्याकडून घेण्यासाठी त्याला मारहाण केल्याची घटना घडली असून त्या शिक्षकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी नंदा गायकवाड यांनी दिली आहे.