प्रतिनिधी, बीड : बीड तालुक्यातील आंबेसावळी गावात आरक्षणाच्या मागणी करिता मराठा समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे. आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत कोणताही सण साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दरम्यान दिवाळीतच काळ्या फिती बांधून आंदोलकांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. या साखळी उपोषणात गावातील प्रत्येक जण आपला सहभाग नोंदवत आहेत. यावर्षी आंबेसावळी गावाने दिवाळी साजरी केली नाही. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी यावेळी उपोषणतकर्त्यांकडून करण्यात आली.
