जनतेज न्युज

दिव्यागांची दिवाळी अंधारातच ; दिव्यांग सेलच्या अधिकाऱ्यांनी घातला महानगरपालिका अधिकाऱ्यांना घेराव

प्रतिनिधी, संभाजीनगर : आज छ.संभाजीनगर महानगरपालिका येथे दिव्यांग सेलच्या वतीने अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. दिवाळी असूनही दिव्यांगांच्या खात्यावर पैसे जमा न झाल्यामुळे त्यांनी हा घेराव घातला आहे. जोपर्यंत दिव्यांगाच्या खात्यावर पैसे मिळत नाही तोपर्यंत रस्ता सोडणार नसल्याचे  दिव्यांग सेलच्या वतीने सांगितले जाते आहे. मनपा दिव्यांग प्रकल्प अधिकारी नंदा गायकवाड यांनी सांगितले की शासनाच्या दोन योजनांचा लाभ घेत असलेल्या काही दिव्यांग बांधवांचे मानधन थांबवून ठेवले आहे. ज्यामध्ये संजय गांधी निराधार योजना व दिव्यांग योजना अशा दोन योजना आहेत.एक व्यक्ती एकाच योजनेचा लाभ घेऊ शकते तरी सुद्धा या दिव्यांगांसाठी प्रयत्न करणार असल्याचे मनपा दिव्यांग प्रकल्प अधिकारी नंदा गायकवाड यांनी सांगितले आहे.