जनतेज न्युज

घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना सातारा पोलिसांनी ठोकल्या बेड्या : १०३ तोळे सोने आणि दोन किलो चांदी केली जप्त : सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

प्रतिनिधी, सातारा : सातारा शहरास जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी घरफोड्या करून नागरिकांच्या घरातील सोने व पैसे लंपास करणाऱ्या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने परदा फाश केला असून यामध्ये 3 गुन्हेगारांना अटक करण्यामध्ये त्यांना यश आले आहे.  अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांकडून साताऱ्यातील तब्बल 27 हून अधिक घरफोड्यांचा तपास उघड झाल्याने या गुन्हेगारांकडून 103 तोळे सोने आणि पाच किलो चांदी असा तब्बल 70 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याबद्दल सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या या विशेष कामगिरीचे कौतुक केले आहे.