प्रतिनिधी, गोंदिया -यावर्षीच्या खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा पुन्हा एकदा फटका बसला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे कापणीला आलेले भातपीक अक्षरश: जमिनदोस्त झाले आहे. यामुळे दिवाळीच्या तोंडावर हे भातपीक घेणारा शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने लवकरात लवकर पंचनामे करुन तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
