जनतेज न्युज

मुंबईकर चाकरमान्यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात येऊ नये : खासदार विनायक राऊत

प्रतिनिधी , रत्नागिरी : मुंबईकर चाकरमान्यांनी यंदाच्या गणेशोत्सवात गावाकडे येऊ नये. कोरोना (Corona) साथीच्या पार्श्वभूमीवर या वर्षी साधेपणाने गणपती उत्सव साजरा करावयाचा असल्यामुळे यंदा गावात येऊ नका, असा सल्ला रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी चाकरमान्यांना दिला आहे . राऊत म्हणाले, गणपती उत्सव जवळ येऊ लागला आहे.
केंद्र शासनाने दिलेल्या सूचनांनुसार परजिल्ह्यातून येणाऱ्या लोकांना १४ दिवसांचे क्वारंटाईन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे अनेक चाकरमानी आता गावी येऊ लागले आहेत. कशेडी चेक पोस्ट येथे वाहनांची गर्दी होत आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना तसेच पुढे पाठवून देणे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. गावामध्ये कोणीच नसेल तर आणि अत्यावश्यक गरज असेल तरच गावाला यावे. अन्यथा गणपती उत्सवासाठी गावी येऊ नये. कोरोना संपल्यानंतर पुढच्या वर्षी आपण अधिक उत्साहात हा सण साजरा करू या. ज्यांचे घर बंद असेल व ज्यांना खरोखर गरज असेल त्यांनी शासकीय नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करू या, असा सल्लाही खासदार राऊत यांनी दिला.