जनतेज न्युज

मोठी बातमी : संजय दत्त पुन्हा लीलावती रुग्णालयात दाखल

प्रतिनिधी , मुंबई : फुफ्फुसांच्या कर्करोगाशी झुंज देणारा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) पुन्हा एकदा मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल झाला आहे. संजय दत्तच्या फुफ्फुसांचा कर्करोग तिसऱ्या अवस्थेत पोहचल्याची बातमी पुढे येत आहे. याआधी त्याने याच रुग्णालयात उपचार घेतले होते. मात्र आज परत त्रास जाणवल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार संजय दत्त याने विदेशात न जाता मुंबईतच उपचार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान याआधीही त्याने लीलावती रुग्णालयात उपचार घेतले आहेत. नुकतीच त्याला सुटीही देण्यात आली होती. मात्र आज परत रुग्णालयात दाखल झाल्याने सगळ्या हितचिंतकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे