जनतेज न्युज

भिम छावा संघटनेच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर आक्रोश आंदोलन करण्यात आले

प्रतिनिधी,पुणे: पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू प्रशासन बेजबाबदर्पणसमुळेच झाल्याचा आरोप भिम छावा संघटनेच्या वतीने करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गायकवाड म्हणाले प्रशासनाच्या भोंगळ कारभार मुळेच पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाल्याचे आरोप त्यांनी त्याठिकाणी केला. या वेळी प्रशासनाच्या विरोधी घोषणा देण्यात आल्या.यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष निलेश गायकवाड सचिव मंगेश कांबळे युवा नेते अनिकेत पालखे पुणे शहर अध्यक्ष अमित मोरे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रतिक कांबळे अदि उपस्थित होते.