जनतेज न्युज

सेंट अँड्रयूज हायस्कुल फॉर गर्ल्स शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन

प्रतिनिधी : पुणे , कॅम्प भागातील सिनेगॉग स्ट्रीटवरील जॉन विल्सन एज्यूकेशन सोसायटीच्या सेंट अँड्रयूज हायस्कुल फॉर गर्ल्स शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर शाम सहानी यांच्याहस्ते दीपप्रज्वलित करून करण्यात आले . यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कविता शेरे व क्रीडा शिक्षक मेघा माहिमकर व शिक्षकवर्ग उपस्थित होते .

यावेळी ईशस्तवन , स्वागतगीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले .तर शाळेच्या मुख्याध्यापिका कविता शेरे यांनी पाहुण्यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत केले .

यावेळी आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर शाम सहानी यांनी सांगितले कि , खेळामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही . आपण नियमितपणे व्यायाम केल्यास व आपल्याला आवडणाऱ्या खेळात सातत्याने सराव केल्यास नक्की यश मिळणार . त्यासाठी आपण आनंदाने खेळा व मन लावून अभ्यास करा . त्यामुळे आपण निरोगी राहाल . स्वयं आत्मविश्वास निर्माण करा . प्रत्येकाने आपल्या आवडत्या क्षेत्रात नाव मिळवून आपल्या देशांचे नाव उंचावले पाहिजे .

यावेळी क्रीडा शिक्षक मेघा माहिमकर यांनी सांगितले कि , लंगडी , डॉजबॉल ,कबड्डी , थ्रो बोल , धावणे , कॅरम , लांब उडी , रिले , खो खो , गोळाफेक , थाळीफेक आदी खेळ या वार्षिक क्रीडा महोत्सवामध्ये होणार आहे . हा क्रीडा महोत्सव शनिवार , ७ डिसेंबर २०१९ पर्यंत असणार आहे .

प्रास्तविक व सुत्रसंचलन अर्चना साठे , स्वागत व परिचय क्रीडा शिक्षक मेघा माहिमकर तर आभार शिल्पा यादव यांनी मानले .