प्रतिनिधी , पुणे : भीम आर्मी बहुजन एकता मिशनच्यावतीने समस्त मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा आरक्षण आंदोलनास जाहीर पाठींबा देण्यात आला . त्या पाठिंबाचे पत्र भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक विकास पासलकर व सचिन आडेकर यांना दिले . पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील आंदोलनात या पाठिंब्याचे पत्र देण्यात आले .
मराठा समजाला आरक्षण मिळालेले पाहिजे , संविधानात आरक्षणाला ५० % मर्यादा असल्याची तरतूद नाही . त्यामुळे शासनाने मराठा समाजाची दिशाभूल न करता आरक्षण देण्यासंदर्भात कार्यवाही करावी . डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांचे नाते या पाठिंबामुळे सिध्द केले . या आंदोलनाला भीम आर्मीचा पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक संदेश दिला . असे मराठा आरक्षण आंदोलनाचे समन्वयक विकास पासलकर यांनी सांगितले .
या आंदोलनात भीम आर्मी बहुजन एकता मिशनचे पुणे जिल्हाध्यक्षा नीता आडसुळे , उपाध्यक्षा उषा राजगुरू , पुणे शहर कार्याध्यक्षा स्वाती गायकवाड , प्रदीप कांबळे , राहुल बनसोडे , मुकेश गायकवाड , भीमराव कांबळे , कन्हेय्या पाटोळे , जालिंदर वाघमारे , निरंजन कांबळे , मामा बनसोडे , नितेश निकम , बाळू गायकवाड , अमित गायकवाड , अश्रफ खान , आकाश गंडगुले , गौतम कोटे , प्रकाश म्हस्के , सतीश पवार व आनंदा धेंडे आदी उपस्थित होते .
