प्रतिनिधी , पुणे : श्रध्दावंत भाविकांसाठी देवालयाची दारे अजूनही बंदच ठेवली. कारण हे सरकार कुंभकर्णी निद्रेत आहे. झोपी गेलेल्या या ‘कुंभकर्ण रुपी सरकारला जागे करणारे’ प्रतीकात्मक आंदोलन पुणे शहर भाजप करणार आहे. कुंभाकर्णाची प्रतिकात्मक प्रतिमा तयार करण्यात येणार आहे.घंटानाद, शंखनाद, भजन, तुतारी अशी पारंपरिक वाद्य वाजवून या आधुनिक कुंभकर्णाला जागे करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अभिनव आंदोलनाला सरकार आणि जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पुण्यात आज ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी हिते आंदोलन करण्यात आलेला आहे.
