जनतेज न्युज

रायगडात भात कापणी, झोडपाणी ला सुरवात….परतीच्या पाऊसाने शेतीचे अतोनात नुकसान…..शेतकरी राजा चिंतेत…..

प्रतिनिधी, रायगड: देशावर कोरोना संकट त्यानंतर रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळ त्या नंतर परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले. कोरोना काळात हातातील काम गेले म्हणून असंख्य बळीराजाने आपली काळी माय कसून अतोनात कष्ट केले होते यावेळी निसर्गाने बळीराजाची झोळी भरघोस पिकांनी भरली मात्र भरलेली झोळी परतीच्या पावसाने फाटून गेली असल्याने शेतकरी राजाला पुन्हा हवालदील झाला आहे तर रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी भात शेती कापणीला आणि भात झोडपणी ला जोरदार सुरवात झाली असून शेतावर आता शेतकरीराजा झोडणी आणि भात कापणीच्या कामाला लागलेला पाहायला मिळत आहे अवेळी पडलेल्या पाऊसामुळे शेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मात्र उरलं सुरलेलं भात पीक हे कापणी आणि झोडणी ला तयार झालं असल्याने शेतकरीराजा भात कापणी आणि झोडणीच्या कामात गुंतलेला पाहायला मिळत आहे. तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी साचून संपूर्ण भात पीक खराब झालं आहे ते शेतकरी आता शासना कडे मदतीची याचना करीत आहेत निसर्गाने फसवलं निदान आपल्या माणसांनी तरी आमची निराशा करु नये अशी अपेक्षा बळीराजा माय बाप सरकार कडे करत आहे