प्रतिनिधी , अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त आज त्यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरीत मोजक्याच गुरूदेव भक्तांच्या उपस्थित त्यांना दोन मीनीट स्तब्ध होऊन मौन श्रद्धांजली वाहिन्यात आली.दरवर्षी मौन श्रद्धांजलीचा हा हृदस्पर्शी कार्यक्रम महासमाधी वर पार पडत असतो परंतू यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो कार्यक्रम प्रार्थना मंदिरा समोर पार पडला.तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली देताना गुरुकुंज मोझरीत निरव शांतता पसरली होती.या महोत्सवात योग गुरू रामदेव बाबा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे हजेरी लावली होती.तर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील गुरुकुंजात हजेरी लावून तुकडोजी महाराजांनी मौन श्रद्धांजली वाहिली..
दरवर्षी या पुण्यतिथी महोत्सवाला देश भरातून लाखो गुरुदेव भक्त येत असतात परन्तु कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता सरकारच्या आदेशाचे पालन करून लाखो गुरुदेव भक्तांनी तुकडोजी महाराजांना घरूनच मौन श्रद्धांजली अर्पण केली.यावेळी देशासाठी शाहिद होणाऱ्या सैनिकां बरोबर कोरोना काळात कोरोना कोरोना योध्दा म्हणून कर्तव्य बजावताना मरण आलेल्या कोरोना योद्धाना देखील यावेळी श्रद्धांजली देण्यात आली.या मौन श्रद्धांजली नंतर सर्व धर्माच्या प्रार्थना पार पडल्या.
