प्रतिनिधी , यवतमाळ : जिल्ह्यातील मांगलादेवी येथील शेतकरी बालाजी तिडके यांनी शेतात पेरलेल्या दोन एकरातील पराटीला बोंडे आलीच नाही .काही झाडांना बोंडे आली ती अवघी ३ ते चार. दोन एकरात फक्त आतापर्यंत बालाजी यांना अवघे दहा किलो कापसाचे उत्पादन झाले आहे.
बालाजी यांनी तालुका कृषी अधिकारी , तहसीलदार नेर . ठाणेदार नेर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे .बोगस बियाणे देणाऱ्या कंपनीवर कारवाई करून भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे. बालाजी यांनी बियाणे कंपनीच्या प्रतिनिधीला वारंवार फोन केले ,परंतु आजपर्यंत कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही किंवा मार्गदर्शन केले नाही. त्यामुळे बालाजी हे पूर्णतः हतबल झाले आहे . सदर कंपनीचे बोगस असलेले बियाणे माझ्या माथी मारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शेतकऱ्याचे चार जणांचे कुटुंब असून पूर्ण उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे.
केवळ दोन एकर शेती असून त्यातून निघालेल्या उत्पन्नावर त्यांचे कुटुंब कसंतरी जगत असतं. आता जीवन जगावे हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झाला आहे .
