जनतेज न्युज

बोंडअळीमुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत ; अभ्यास अहवालात व्यक्त केली भीती

प्रतिनिधी , यवतमाळ : खरीप हंगामातील सोयाबीन आणि कपाशी पिकाचे नुकसान झाले. लागवड खर्च निघाला नाही. येथील
सावित्रीबाई जोतीराव फुले समाजकार्य महाविद्यालयाने सर्वेक्षण करून अभ्यास अहवाल तयार केला. बोंडअळीमुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत अडकतील अशी भीती अभ्यास अहवालात व्यक्त केली आहे.
यवतमाळ येथील सावित्रीबाई जोतीराव फुले समाजकार्य महाविद्यालयाने
अतिवृष्टी आणि बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्या बाबतचा अभ्यास अहवाल तयार केला. त्याचे प्रकाशन शेतकरी नेते शेती अभ्यासक चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते महाविद्यालयात करण्यात आले. हा अहवाल ते शासनाला सादर करणार आहे. कपाशी बियाण्यांची कोट्यवधी रुपयांची विक्री हंगामात केली जाते. यातून मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. परंतु, या हंगामाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. त्याचे परिणाम आगामी काळात दिसणार आहे. सरकारने योग्य दखल घ्यावी आणि उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.