जनतेज न्युज

…. अन्यथा भविष्यात सार्वत्रिक निवडणूकीवर बहिष्कार – वारकरी संघटनांचा इशारा ….

प्रतिनिधी , पंढरपुरात : आषाढी वारी प्रमाणे जर कार्तिकी वारीला सरकारने पंढरपूरात वारकरी सांप्रदायावर निर्बंध घातले तर लोकशाहीने दिलेल्या हक्काप्रमाणे वारकरी सांप्रदाय मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशार वारकरी समन्वय समितीने दिला आहे.
पंढरपुरात प्रमुख चार वाऱ्या भरतात त्या पैकी एक 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. आषाढी वारी मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे प्रशासनानं कडक निर्बंध घालून ही वारी पार पडलेली होती
सरकार आता हळूहळू अनलाॅक करत आहे.यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्या मध्ये गर्दी होणार्या ठिकाणांचा समावेश आहे. पण सरकार वारकरी सांप्रदायाला आपल्या परंपरा जपण्यासाठी सहकार्य करत नाही. आषाढी ला जर सरकारला सहकार्य केले तर आता तुम्ही कार्तिकी वारीला सहकार्य करावे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कार्तिकी वारीला उघडावे. किमान पितळी महादरवाजा उघडावा. पंढरपूरात फडकरी, महाराज मंडळी यांचे मठ आहेत. तिथे किमान ५० तरूण वारकरी मंडळीना सर्व नियम पाळत राहण्याची भजन ,किर्तन करण्याची परवानगी द्यावी.
पंढरपूरात कार्तिकी वारीला सरकारने अजिबात संचारबंदी लावण्याचा विचार करू नये. वारकरी सांप्रदायाच्या परंपरा तरी पुढे चालवण्याची परवानगी द्यावी. जर सरकार आषाढी वारी प्रमाणे कार्तिकी वारीला निर्बंध लावण्याचा विचार करत असेल तर मग वारकरी सांप्रदाय येणार्या प्रत्येक निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकेल असा इशारा दिला आहे.