आर्किटेक्ट अन्वय नाईक अलीबाग आत्महत्या प्रकरणात नाईक कुटुंबाच्या मागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत.
प्रतिनिधी , आर्किटेक्ट अन्वय नाईक व त्यांच्या वयोवृध्द आई कुमुद नाईक यांनी दिनांक ५-५-२०१८ रोजी कावीर, अलीबाग येथील आपल्या निवासी बंगल्यात आत्महत्या केली होती. आर्किटेक्ट अन्वय नाईक हे सुप्रसिद्ध इंटेरियर डिझायनर होते. याशिवाय स्वभावाने प्रेमळ व समजूतदार होते. त्यांनी मुंबईत नामांकित पत्रकार अर्णब गोस्वामी, फिरोज खान व नितेश सारडा यांच्या कार्यालयातील काम योग्य प्रकारे केले होते. या कामाचे एकूण थकित येणे ५.४० कोटी रुपये होते. कार्यालय उद्घाटन झाले की थकित रक्कम देण्याची कबुली या तिघांनी दिली होती. अर्णब गोस्वामी हे नाव खूप खूप मोठे मानले जाते. याशिवाय आर्किटेक्ट अन्वय नाईक यांचा सभ्य व भिडस्त स्वभाव. पैसे मिळतील अशी अपेक्षा… परंतू सज्जन पध्दतीने पाठपुरावा करूनही या तिघांनी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांची थकित रक्कम दिली नाही. या परिस्थितीत नाईक कुटुंबातील दैनंदिन जीवनातील आर्थिक ओढाताण सुरू झाली होती… हे सर्व असह्य होऊन दुर्दैवाने शेवटी आर्किटेक्ट अन्वय नाईक व त्यांच्या ८४ वर्षिय आई कुमुद नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी आपल्या निवासी बंगल्यात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते. पोलिस केस झाली होती. परंतू दुर्दैवाने त्यावेळी फडणवीस सरकारने जुजबी माहिती घेऊन व कागदोपत्रीच काही चौकशी करून हे प्रकरण कोणत्याही सबळ कारणाशिवाय बंद केले होते. आज सुशांत राजपूत व अर्णब गोस्वामी साठी भाजप नेत्यांचा जीव कासाविस झाला आहे. दिल्ली पासून गल्ली पर्यंत – अमित शाह ते चंद्रकांत पाटील व राम कदम धाय मोकलून रडत व ओरडत आहेत. त्यांना न्याय मिळालाच पाहिजे याबाबत दुमत नाही. परंतू दुर्दैवाने कोणीही नाईक कुटुंबालाही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत नाहीत किंवा सहकार्य करत नाहीत. अर्णब गोस्वामी यांनी पत्रकारितेची ऐशीतैशी केली आहे. परंतू भाजपचे नेते म्हणतात, अर्णब गोस्वामी यांनी कशी पत्रकारिता करावी याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे. असे असेल तर मग मर्यादा, नितीमत्ता, साधन शुचिता, आचार संहिता अशा अनेक शब्दांचे अर्थ कोणते काढायला पाहिजेत…?? हे सुध्दा भाजप आर एस एस च्या माध्यमातून स्पष्ट केले पाहिजेत. अशीच भाषा आम्ही वापरतो तेंव्हा ते अश्लाघ्य, असामाजिक व गैर असे बरेच काही ठरते. तरीही आर एस एस च्या ब्राह्मणी माध्यमातून अर्णब गोस्वामी यांच्या गुन्ह्यांचे पूर्ण समर्थन केले जात आहे. हे मराठी माणसाचे दुर्दैव आहे असे लक्षात येते…
- आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक व मुलगी आज्ञा नाईक या दोघी मायलेकींनी फडणवीस सरकार , भाजप नेते, गुंड पत्रकार वा त्यांचे हस्तक, दाबलेले पोलीस इत्यादी अनेक बाबी लक्षात न घेता आपल्या न्यायिक हक्कांचा आवाज आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संघटना व संस्था पर्यंत पोहचवला. तसेच स्थानिक पातळीवरील पाठपुरावा आम्ही चालू ठेवणार आहे. याच प्रयत्नांना यश आले व महाराष्ट्र शासनाने संपूर्ण फेर आढावा घेऊन सन २०१९ मध्ये फडणवीस सरकारने विशेष अधिकारांचा गैरवापर करून बंद केलेले हे प्रकरण पुन्हा ओपन केले आहे. यातूनच अलीबागच्या पोलीसांनी अर्णब गोस्वामी या आरोपीस त्याच्या मुंबईतील घरातून चार पाच नोव्हेंबरला रात्री उशिरा अटक केली. त्यावेळी त्याने आपल्या स्वभावानुसार बरेच काही नाटकं केले होते. त्यावेळी पोलिसांनी आपल्याला मारहाण केली असे कुभांड अर्णब गोस्वामी यांनी रचले होते. सध्या अर्णब गोस्वामी, फिरोज खान व नितेश सारडा तिघेही तळोजा तुरुंगात सुखरूप आहेत . आरोपींना जसे वागवायला पाहिजेत तसेच सर्व दिले जात आहे. परंतू आर. एस. एस. (RSS) चे व भाजपचे नेते एकट्या अर्णब गोस्वामी साठी घसे कोरडे करत आहेत. आरोपीच्या सावलीनेही राजकारणी व्यक्ती बाटतात असे भाजपचे तत्वज्ञान आहे. यामुळेच पूर्वी कधीतरी शरदचंद्रजी पवार यांच्या सोबत एक अनोळखी आरोपी दिसताच भाजपने सर्व आकाश पाताळ एक केले होते.. पण दुर्दैवाने आज अत्यंत दुःखदायक बातमी आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे आरोपी अर्णब गोस्वामीसाठी आपले संवैधानिक पद पणाला लावून अशोभनीय वर्तन करत आहेत. यातून आरोपी अर्णब गोस्वामी अचानक राजभवन मुंबई येथे सुरक्षेच्या कारणास्तव आला तर नवल वाटून घेऊ नये. खरे तर हा न्यायालयीन प्रक्रियेत एक प्रकारे हस्तक्षेप आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हीच भूमिका घेतली आहे. सुप्रसिद्ध वकील हरिष साळवे यांनी कोर्टात विचारले की, अर्णब गोस्वामी यांना जामीन मंजूर केला तर आभाळ कोसळेल काय ?? आमचेही तसेच मत आहे की , अर्णब गोस्वामी तुरुंगात राहिले तर आभाळ कोसळेल काय ?? वकील हरिष साळवे यांनी भारतातील सर्व तुरूंग बंद करण्यासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला तर बरे होईल हीच विनंती आहे.
मित्रांनो , या पृष्ठभुमीवर आपण अक्षता नाईक व आज्ञा नाईक या दोघींच्या पाठीमागे ठाम व खंबीरपणे उभे आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीने अक्षता नाईक व आज्ञा नाईक यांना सर्व सहकार्य करावे. पूर्ण मानसिक आधार देणे. रायगड जिल्ह्यातील व अलीबाग परिसरातील कार्यकर्त्यांनी गरज भासल्यास कोर्ट कचेरी किंवा पोलिस ठाण्यात जाऊ. समविचारी सहकारी व संघटना सोबत घेऊन त्यांनाही ही माहिती देणे व सोबत घेऊ. या मायलेकी ज्या जिद्दीने आपल्या माध्यमातून लढत आहेत ते अभिमानास्पद व गौरवास्पद आहे..मित्रांनो , मी नाईक कुटुंबातील कोणालाही ओळखत नाही. पण परिस्थिती अत्यंत बिकट आहे असे लक्षात येते. कायदा व न्यायालये आपले काम करतील. राज्य सरकारला विनंती व आव्हान आहे. ५.४० कोटी रुपयाचे पुराव्यासहित कागदपत्र राज्य सरकारला सुपूर्द करणार…
