प्रतिनिधी , पंढरपूर : महाविकास आघाडी सरकारने २०१९ साली महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली. दोन लाखांपर्यंत कर्ज माफी देण्यात आली. मात्र पंढरपूर तालुक्यातील अनेक शेतकरी या कर्जमाफी योजनेपासून आजही वंचित आहेत. तर दुसरीकडे बॅंका वसूलीसाठी शेतकर्यांना तगादा लावत आहेत. याविरोधात आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने कॅनरा बॅंकेसमोर शेतकर्यांना घेवून आंदोलन केले. बॅंकेच्या गहाळ कारभारामुळे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय .
तर सरकारच्या कर्जमाफी पोर्टलवर पात्र शेतकर्यांची माहिती भरली होती. त्यामध्ये अनेक शेतकर्यांना अपात्र दाखविण्यात आले तर काही शेतकर्यांचे पैसे अद्याप जमा झाले नसल्याचे बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले .
