डोंबिवली मनसेचा इशारा
डोंबिवली मनसेचा इशारा
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : महाराष्ट्र्र सरकारने दिवाळीच्या काळात नागरिकांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात लोकडाऊन काळातील वीज बिल माफी देता येणार नसल्याची भूमिका घेत सरकारने गरीब नागरिकांना शॉक दिला आहे. यानंतर मनसेने आक्रमक पवित्रा घेत सोमवार पर्यत सरकारने निर्णय घ्यावा अन्यथा मनसे आक्रमक पवित्रा घेईल असा इशारा दिला होता .या पार्श्वभूमीवर आज मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी डोंबिवलीधील महावितरण कार्यलयात निवेदन दिले .यावेळी बोलताना कदम यांनी आर्थिक डबघाईमुळे नागरीक पिचलेले असताना सरकारने दिलेला शब्द पाळलेला नाही. आता थकबाकी दाराची वीज जोडणी तोडण्याचा प्रयत्न महावितरणच्या कर्मचाऱ्यानी केल्यास मनसे आंदोलक पवित्रा घेणार असून या कारवाई विरोधात नागरिक आणि महावितरण किंवा सरकार यांच्यामध्ये नागरिकांच्या वतीने मनसे उभी राहणार असल्याने करोना काळात धाडलेल्या जाचक विजबिलाच्या थकबाकीदार नागरिकांवर कारवाई केली जाऊ नये. तर नागरिकांना दिलासा देण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली .
