मागण्या मान्य न झाल्यास महावितरण कार्यालय पेटवून देण्याचा इशारा…
प्रतिनिधी , बुलडाणा : महाराष्ट्रामध्ये महावितरणच्या विरोधात स्वाभिमानीचे राजू शेट्टी रविकांत तुपकर यांनी आंदोलनाची हाक दिली. त्याच अनुषंगाने आज बुलढाण्यात महावितरणच्या कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.विद्युत रोहित्र उपलब्ध करून द्यावे. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे तसेच शेतकऱ्यांना विज बिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये या अन्य मागण्यांसंदर्भात हे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील .तसेच मागण्या मान्य न झाल्यास महावितरणचे कार्यालय पेटवून देण्याचा इशाराही यावेळी स्वाभिमानीचे राणा चंदन यांनी दिला आहे…
